अजित पवारांना नडलेल्या आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा कोण?

राजकीय

माढा तालुक्यातील अवैध मुरुम उत्खननाच्या कारवाईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी झालेल्या वादामुळे चर्चेत आलेल्या आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांच्याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये त्यांचा अजित पवार यांच्याशी झालेला संवाद स्पष्टपणे दिसून येतो. पण या अधिकाऱ्याविषयी जाणून घेण्यासारखे अनेक पैलू आहेत.

अंजली कृष्णा कोण?

अंजली कृष्णा (असले तरी त्यांचे पूर्ण नाव अंजना कृष्णा व्ही.एस. आहे) या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा जन्म १२ डिसेंबर १९९७ रोजी केरळच्या तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील मलयंकीजू गावात झाला. त्यांचे वडील बीजू हे एक साधे कपड्यांचे व्यवसाय करतात आणि आई स्थानिक न्यायालयात टायपिस्ट म्हणून काम करतात. म्हणजेच, अंजली सामान्य कुटुंबातून आल्या आहेत.

त्यांचे प्राथमिक शिक्षण पूजप्पुरामधील सेंट मॅरीज सेंट्रल स्कूलमध्ये झाले. नंतर नीरमंकरा येथील HNMSPB NSS कॉलेज फॉर वुमेनमधून त्यांनी बीएससी पदवी प्राप्त केली. उच्च शिक्षणाचा मार्ग निवडून त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली आणि पहिल्याच प्रयत्नात यश मिळवत २०२२-२३ च्या यूपीएससी सीएसई परीक्षेत AIR-३५५ रँक मिळवून आयपीएस अधिकारी बनल्या.

अवैध उत्खनन आणि वाद:

माढा तालुक्यातील कुर्डू गावात सुरू असलेल्या अवैध मुरुम उत्खननाविरुद्ध कारवाई करताना अजित पवार यांच्याशी त्यांचा वाद झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना फोन केल्यानंतर हा वाद झाल्याचे समजते. या प्रकरणामुळे अंजली कृष्णा यांचे नाव सर्वांनाच परिचित झाले आहे. या प्रकरणाचा आता पुढे या प्रकरणामध्ये काय होते औचित्याचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत