वाराणसी : लोक-धाराशिव न्यूज नेटवर्क
शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज वाराणसी येथून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केला आहे. देशभरातील 9.7 कोटींपेक्षा अधिक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 20,500 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.
पंतप्रधान मोदी आज वाराणसी दौऱ्यावर असून, सकाळी 11 वाजता विविध विकास योजनांचे उद्घाटन करताना त्यांनी हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट ट्रान्सफर केला. DBT (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत.
कसे तपासाल की 2000 रुपये तुमच्या खात्यात आले आहेत का?
- pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा.
- ‘Farmer Corner’ मधून ‘Beneficiary Status’ वर क्लिक करा.
- आधार क्रमांक किंवा खाते क्रमांक टाका.
- “Get Data” वर क्लिक करा व खात्यात पैसे आलेत का ते तपासा.
ज्यांचे पैसे अडकले आहेत त्यांनी काय करावे?
- e-KYC पूर्ण आहे का ते तपासा.
- बँक खाते आधारशी लिंक आहे का ते खात्री करा.
- काही अडचण असल्यास खालील हेल्पलाईन नंबरवर तक्रार करा:
- PM Kisan हेल्पलाईन: 155261 / 011-24300606
- टोल फ्री नंबर: 1800-115-5525
लाभ कोणाला मिळणार नाही?
- सरकारी नोकरीत असलेल्या शेतकरी कुटुंबांना.
- 10 हजार पेन्शनधारकांना.
- इनकम टॅक्स भरलेल्या शेतकऱ्यांना.
- संस्थात्मक (Company/Trust) नावावर शेती असलेल्यांना.
महत्वाचे:
e-KYC पूर्ण नसल्यास तुमचा हप्ता रोखला जाऊ शकतो. त्यामुळे तात्काळ e-KYC पूर्ण करा व खात्याची माहिती अपडेट ठेवा.
