बीड जिल्ह्यातील महाजनवाडी गावात आठ वर्षांपूर्वी सरकारी खर्चातून तब्बल ८ लाख रुपये खर्च करून एक आधुनिक स्मशानभूमी बांधण्यात आली होती. या स्मशानभूमीची उद्दिष्टे मोठी होती, म्हणजे गावातील लोकांना मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी योग्य आणि शिस्तबद्ध जागा उपलब्ध करून देणे. मात्र दुर्दैवाने, या आठ वर्षांत या स्मशानभूमीचा कुणीही वापर केलेला नाही. महाजनवाडी गावाची लोकसंख्या २००० च्या जवळपास असुन या गावासाठी बांधण्यात आलेली ही स्मशानभूमी गावापासून सुमारे अडीच किलोमीटर दूर आहे. त्यामुळे गावकरी मृतदेहांना इतक्या लांब जाऊन अंत्यसंस्कार करण्याऐवजी गावाजवळच असलेल्या मोकळ्या जागेतच अंत्यसंस्कार करतात. परिणामी, बांधून ठेवलेली आणि खर्च करून उभी केलेली ही स्मशानभूमी पूर्णपणे नकोसी झाली आहे.
ह्याच कारणाने गावकऱ्यांमध्ये प्रशासनाविरोधात रोष वाढला आहे. ते असे म्हणतात की, स्मशानभूमी गावकऱ्यांच्या सोयीसाठी बांधण्यात आली नाही, तर ती फक्त कंत्राटदारांच्या फायद्यासाठी आणि सरकारी निधीचा फालतू खर्च करण्यासाठीच हे काम करण्यात आले असल्याचे. गावकऱ्यांचे मत आहे . प्रशासनाने योग्य नियोजन न करता, स्थानिक गरजा समजून न घेता, स्मशानभूमी गावापासून दूर बांधली. त्यामुळे लोकांना वापरासाठी ती जवळची वाटत नाही.
बीड जिल्ह्यातील एकूण १३९४ गावांपैकी तब्बल ६५६ गावांमध्ये अजूनही स्मशानभूमी नाही, त्यामुळे अनेक ठिकाणी लोकांना अंत्यसंस्कारासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, विशेष म्हणजे पावसाळ्याच्या काळात. अशा परिस्थितीत, महाजनवाडीतील या बिना कामाच्या स्मशानभुमीमुळे स्थानिक लोकांमध्ये निराशा आणि संताप अधिक वाढला आहे. गावकरी प्रशासनावर कठोर टीका करत आहेत . सरकारी निधी वाया घालवण्यापेक्षा मूळ समस्या सोडवण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
परंतु, प्रशासनाच्या या अनागोंदी कारभारामुळे गावात अवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट पूर्ण होत नाही. या स्मशानभूमी प्रकरणाला स्थानिक प्रशासनाचा भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थेचा एक उदाहरण म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे लोक प्रशासनाकडेून अधिक जबाबदारी आणि पारदर्शकता अपेक्षित करत आहेत.
ही घटना केवळ महाजनवाडी गावापुरती मर्यादित नसून, बीड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आधारभूत सुविधा न मिळाल्यामुळे लोकांच्या मृत्यूच्या नंतरच्या क्षणांमध्येही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर, ग्रामस्थ आणि सामाजिक संघटना स्मशानभूमींसंबंधी अधिक प्रभावी आणि ग्राम्य गरजांशी जुळणारे नियोजन करण्यासाठी प्रशासनाकडे मागणी करत आहेत.
सरकार आणि प्रशासनाने गावकऱ्यांच्या भावना आणि गरजा लक्षात घेऊन, अशा पद्धतीने स्मशानभूमींचे नियोजन करावे, ज्यामुळे त्याचा प्रभावी वापर होईल आणि मृतदेहांवर आदरयुक्त अंत्यसंस्कार होऊ शकेल, अशी सर्वांची अपेक्षा आहे.
