फडणवीसांचे विधान या वादाची ठिणगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका विधानाने पडली. भारत–पाक क्रिकेट सामन्यालाविरोध करणाऱ्या ठाकरे गटावर टीका करताना त्यांनी पाक क्रिकेटपटू जावेद मियाँदादला घरी जेवायला बोलावणाऱ्यांनी यावर बोलूनये, असे म्हटले. या विधानानंतर ठाकरे गटाकडून भाजपवर जोरदार हल्ला चढवण्यात आला.
- पहलगाम येथे अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आखलेला क्रिकेट सामना पुन्हा एकदाराजकीय वर्तुळात चर्चेचा आणि वादाचा विषय बनला आहे. या मुद्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने अत्यंतआक्रमक भूमिका घेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला असून. ठाकरे गटानेभाजपवर “धंदो प्रथम, वंदे मातरम!” हाच त्यांचा खरा नारा असल्याचा गंभीर आरोप करत, राष्ट्रभक्ती आणि अर्थकारण यांमधीलसंघर्षाला पुन्हा एकदा तोंड फोडले आहे.
अंबादास दानवे यांचा भाजपवर पलटवार: “हा सामना अर्थकारणाच्या चष्म्यातून पाहता!” ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज भाजपवर जोरदार हल्ला चढवला. असुन त्यावर बोलताना दानवे म्हणालेकी “देवेंद्रजी, हिंदुस्थान–पाक सामन्यांवरून थेट हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत आपल्याला जाण्याचे कारण नाही,” असेते म्हणाले. बाळासाहेबांनी घरी आलेल्या पाहुण्यांचा आदर केला, ही आपली महान संस्कृती आहे, ती त्यांनी जपली. मात्र, त्यांनीविमान वळवून न बोलावता पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा केक कापण्यासाठी ते पाकिस्तानात गेलेले नव्हते, असा टोला त्यांनीपंतप्रधानांना लगावला.
दानवे पुढे बोलताना असे देखील म्हणाले की, “आपल्या बहिणींचे कुंकू पुसण्याचे कुकर्म करणाऱ्या लोकांसोबत सामने न खेळण्याचाबाळासाहेबांचा सिद्धांत कायम राहिला, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. हे असले भाष्य करून आपण त्यांच्या राष्ट्रभक्तीवर बोटदाखवत आहात का?”असा सवाल करत त्यांनी त्यांनी”धंदो प्रथम, वंदे मातरम! हाच आपल्या भाजप पक्षाचा नारा आहे, कारण तुम्हीहिंदुस्थान–पाकिस्तान सामना अर्थकारणाच्या चष्म्यातून पाहता. आमच्यासाठी तो राष्ट्रभक्तीचा विषय आहे! ते तुम्हाला कळणारनाही. कळले तरी वळणार नाही,” असे खरमरीत विधान त्यांनी केले.
‘अर्धवट ज्ञानी‘ म्हणत खासदार संजय राऊत यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. असुन ते पुढे बोलताना म्हणाले कि देवेंद्र फडणवीस हे अर्धवट ज्ञानी आहेत. मुळात संपूर्ण भाजपच अर्धवट ज्ञानी आहे. भाजपवाल्यांच्या गुडघ्यातही मेंदूनाही,” अशी बोचरी टीका त्यांनी केली. जावेद मियाँदाद मातोश्रीवर का आले होते आणि त्यावेळी बाळासाहेबांची भूमिका काय होती, यावर राऊत यांनी प्रकाश टाकला.
“जावेद मियाँदाद हे बाळासाहेबांना भेटायला आले होते. भारत–पाकिस्तान क्रिकेटला विरोध करू नका, असे ते सांगणार होते. पणबाळासाहेबांनी त्यांना चहा घ्यायला सांगितला आणि परत पाठवले. दहशतवाद आणि क्रिकेट या दोन्ही गोष्टी एकत्र चालणार नाही, असे बाळासाहेब त्यांना म्हणाले होते,” असे राऊत यांनी आठवण करून दिली.
राऊत यांनी पंतप्रधान मोदींवरही अप्रत्यक्ष निशाणा साधत म्हटले की, “बाळासाहेबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखी शेपूटघातली नव्हती. तुम्हाला कुंकवाची कदर असेल, तर अशी विधाने करू नका. तुम्ही आरशाची फॅक्टरी सुरू केली आहे, पण त्यामध्येतुम्हाला तुमचेच खरे रूप दिसेल.” त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना थेट प्रश्न विचारला की, “पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यासतुमचा पाठिंबा आहे की नाही? हे पहिल्यांदा सांगा.” पैशांसाठी भाजपने ‘पाकड्यांसमोर शेपूट घातली‘ असल्याचा गंभीर आरोपहीसंजय राऊत यांनी यावेळी केला.
पुढील राजकीय पडसाद ठाकरे गटाच्या या तिखट टीकेमुळे भाजपमधून संतप्त प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. भारत–पाकिस्तान संबंध, राष्ट्रभक्ती आणि क्रिकेट या नेहमीच भावनाप्रधान मुद्यांवरून सुरू झालेल्या या राजकीय युद्धात आतापुढील काळात आणखी कोणते आरोप–प्रत्यारोप होतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मात्र, या वादामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातएक नवा अध्याय सुरू झाला आहे, हे निश्चित.
