लातूर: प्रतिनिधी जनतेचे लाडके नेते आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अजरामर व्यक्तिमत्व लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्यापूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात एका भव्य व ऐतिहासिक सोहळ्यात करण्यात आले. राज्याचेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुतळा अनावरित करण्यात आला, यावेळी उपस्थित जनसमुदायाने जयघोषांनी परिसरदणाणून सोडला होता. या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांमध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. शिवेंद्र राजे भोसले, ग्रामविकास मंत्रीजयकुमार गोरे, माजी मंत्री धनंजय मुंडे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार विक्रम काळे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार संजय बनसोडे, कार्यक्रमाचे आयोजक आमदार रमेश आप्पा कराड, जिल्हाधिकारी वर्षाताई ठाकूर यांच्यासह अनेक अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुतळ्याच्या अनावरणावेळी संपूर्ण प्रांगणात गोपीनाथ मुंडे यांच्या जयघोषांनी, घोषणाबाजीने आणि टाळ्यांच्या गजरात वातावरणभारून गेले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जनसेवेचा, त्यांच्या संघर्षमयराजकीय प्रवासाचा आणि गरीब–शेतकरी, वंचितांसाठी केलेल्या अतुलनीय कामांचा विशेष उल्लेख केला. “गोपीनाथ मुंडे हे फक्तनेते नव्हते, तर ते प्रत्येकाच्या घरचा माणूस होते. त्यांनी जनतेसाठी झटून काम केले, त्याग आणि सेवाभाव हेच त्यांचे खरे ओळखपत्रहोते,” असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. मुख्यमंत्र्यांच्या या भाषणादरम्यान गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आपल्या भावना आवरूशकल्या नाहीत. वडिलांच्या आठवणींनी त्या क्षणभर भावूक झाल्या आणि त्यांचे डोळे पाणावले. त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनीहीटाळ्यांच्या गजरात आणि घोषणाबाजीत त्यांना भावनिक आधार देत उभारी दिली. कार्यक्रमानंतर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सर्व मान्यवरांनी अभिवादन केले. जिल्हा परिषद परिसरातील फुलांची आकर्षकसजावट, वाजणारे ढोल–ताशे यांचा गजर आणि सर्वत्र फडकणाऱ्या भगव्या झेंड्यांमुळे या कार्यक्रमाला एक भव्य, दिव्य आणिउत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते. गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याची आणि विचारांची आठवण करून देणारा हा सोहळा लातूरच्याइतिहासात कायम स्मरणात राहील.
Continue Reading