नक्की वाचा: आयुष कोमकर हत्याप्रकरणात मोठी बातमी बंडू आंदेकर समेत सहा जणांना पोलिसांनी केली अटक
Photo Credit by Divya Marathi
Continue ReadingPhoto Credit by Divya Marathi
Continue Readingप्रतिनिधी :-मुंबई राज्यातील सुमारे ९४ लाख शेतकरी कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही काळापासूनप्रतीक्षेत असलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी‘ योजनेच्या सातव्या हप्त्याच्या वितरणाला अखेर राज्य सरकारने हिरवा कंदीलदाखवला आहे. या हप्त्यासाठी तब्बल १९३२.७२ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी देणारा शासन निर्णय (GR) प्रसिद्धकरण्यात आला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच २००० रुपये जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अफवांचे ढग विरळले, नमो शेतकरी योजना बंद होणार,” “पुढील हप्ता मिळण्यास खूप उशीर होणार,” अशा अनेक निराधार चर्चा आणि अफवांना गेल्याकाही दिवसांपासून पेव फुटले होते. सोशल मीडिया आणि गावच्या पारावर होणाऱ्या या चर्चांमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे आणिगोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आशाचे कृषी विभागाने अधिकृत शासन निर्णय (GR) प्रसिद्ध करून या सर्व अफवांना सणसणीत चपराक दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळ शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. काय आहे ही दुहेरी लाभाची योजना? नमो शेतकरी महासन्मान निधी‘ ही योजना म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक प्रकारचे आर्थिक सुरक्षा कवच आहे. ही योजनाकेंद्र सरकारच्या लोकप्रिय ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी‘ योजनेला पूरक म्हणून काम करते. यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनादुहेरी फायदा मिळतो पंतप्रधान किसान सन्मान निधी (केंद्र सरकार): वर्षाला ६,००० रुपये (तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी २,०००रुपये).देते आणि नमो शेतकरी महासन्मान निधीच्या माध्येमातून राज्य सरकार देखील वर्षाला ६,००० रुपये (तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी २,००० रुपये देते यामुळे महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना दोन्ही योजनांमधून मिळून वर्षाला एकूण १२,००० रुपयांची आर्थिक मदत मिळते, ज्यामुळे त्यांनाशेतीसाठी आवश्यक असणाऱ्या खते, बियाणे आणि इतर खर्चांसाठी मोठा आधार मिळतो. पारदर्शक प्रणाली आणि सर्वांना लाभाचे ध्येय या निधी वितरणाची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार आहे. केंद्र सरकारच्या पीएम–किसान योजनेच्यालाभार्थ्यांच्या आकडेवारीनुसार कृषी आयुक्तालयाने निधीची मागणी केली होती, ज्याला सरकारने तातडीने मंजुरी दिली.यानिर्णयाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, शासनाने केवळ तांत्रिक बाबींवर अडकून न राहता सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवला आहे. ज्याशेतकऱ्यांची ‘पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम‘ (PFMS) वर नोंदणी अपूर्ण आहे किंवा ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशीजोडलेले नाही, अशा शेतकऱ्यांनाही तांत्रिक त्रुटी दूर करून या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. निधी शेवटच्या आणि योग्यलाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठीची संपूर्ण जबाबदारी कृषी आयुक्तांवर सोपवण्यात आली आहे. “लवकरच रक्कम खात्यात जमा होईल” – कृषिमंत्री या निर्णयावर कृषिमंत्री श्री. दत्तात्रय भरणे यांच्याकडून शिक्कामोर्तब झाला असुन ते माध्यमांशी बोलताना म्हणालेकी नमो शेतकरीमहासन्मान निधी‘ सातव्या हप्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आला असून, ती लवकरच सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कमजमा होईल एकंदरीत, खरीप हंगामाच्या पिक काढणीच्या अत्यंत महत्त्वाच्या काळात हा निधी शेतकऱ्यांच्या हाती पडणार असल्याने, त्यांच्यासाठी हा निर्णय संजीवनी देणारा ठरला असल्याचे शेतकर्यात चर्चा आहे.
Continue Readingकोल्हापूर येथील माधुरी हत्तीच्या आरोग्याच्या संदर्भात PETA इंडियाने महत्त्वाचा आक्षेप नोंदवला आहे. माधुरीला मुक्तपणे फिरण्यासाठी, वेदना कमी करण्यासाठी आणि तिच्या आजारपणांवर उपचार करण्यासाठी प्रगत दर्जाच्या पशुवैद्यकीय सुविधा अत्यंत आवश्यक असल्याचा PETA चा दावा आहे. महाराष्ट्रात सध्या अशी सेवा देणारी वनतारा राधे कृष्ण मंदिर एलिफंट वेल्फेअर ट्रस्ट ही एकमेव संस्था असल्याचा त्यांनी विशेष उल्लेख केला आहे. […]
Continue Readingउस्मानाबाद | प्रतिनिधी दिनांक: ५ ऑगस्ट २०२५ सोलापूर-धुळे महामार्गावरील चोराखळी (ता. कळंब) येथील ‘महाकाली कलाकेंद्र’ या डान्सबारच्या परिसरात सोमवारी (४ ऑगस्ट) रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. या हल्ल्यात संदीप यल्लाप्पा गुट्टे (वय ४०, रा. येरमाळा) हे जखमी झाले असून, त्यांच्यावर धाराशिव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण […]
Continue Readingशिरपूर (धुळे) : माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्याविरोधात 2016 मध्ये केलेल्या निराधार आरोपांमुळे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिरपूर न्यायालयाने त्यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 499 (मानहानी) आणि 500 (मानहानीसाठी शिक्षा) अंतर्गत वॉरंट जारी केले आहे. डॉ. मनोज महाजन यांनी 12 ऑगस्ट 2016 रोजी दमानिया […]
Continue Readingनवी दिल्ली / मुंबई — पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेचा 16वा हप्ता नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. केंद्र सरकारकडून पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी 2000 रुपये दिले जातात. मात्र, यंदा अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांऐवजी थेट 7000 रुपये जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नेमकी ही रक्कम कुठून आली? कोणत्या शेतकऱ्यांना हा […]
Continue Readingप्रतिनिधी:-लोक धाराशिव न्युज राज्याचे नवे कृषीमंत्री म्हणून नुकतेच पदभार स्वीकारलेल्या दत्ता मामा भरणे आता त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. महसूल दिनानिमित्त इंदापूर येथे आयोजित कार्यक्रमात भरणे यांनी केलेल्या विधानावरून सध्या राजकीय वर्तुळात जोरदार खलबते सुरु आहेत. भरणे म्हणाले, “सरळ काम सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करतात त्याची माणसं नोंद ठेवतात.” […]
Continue Readingवाराणसी : लोक-धाराशिव न्यूज नेटवर्क शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज वाराणसी येथून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केला आहे. देशभरातील 9.7 कोटींपेक्षा अधिक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 20,500 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदी आज वाराणसी दौऱ्यावर असून, सकाळी 11 वाजता […]
Continue Readingधुळे | प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आमदार एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रोहिणी खडसे यांच्या भावजय, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणावर भाष्य करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. “मी सध्या केंद्रीय मंत्री पदासारख्या जबाबदारीच्या पदावर आहे. या प्रकरणातील सत्यता समोर येईपर्यंत मला काही बोलणे योग्य ठरणार नाही”, असे मत त्यांनी व्यक्त […]
Continue Reading