छत्रपती संभाजीनगरमध्ये CA ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा सिलिंडर स्फोटात जागीच मृत्यू.”

प्रतिनिधी: छ.संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमधील एका दुःखद घटनेने मानसिक आरोग्याच्या महत्त्वाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. बुधवार, २० ऑगस्टरोजी, न्यू शांतिनिकेतन कॉलनीत राहणाऱ्या २० वर्षीय ओम संजय राठोड या तरुणाचा गॅस सिलिंडर स्फोटात मृत्यू झाला. चार्टर्डअकाउंटन्सी (CA) चा अभ्यास करणारा ओम मानसिक ताणाने ग्रस्त होता,  प्राथमिक स्त्रोताकडून मिळालेल्या माहितीनुसार, राठोडने प्रथम पंख्याला साडीने गळफास घेण्याचा प्रयत्न केला, पण तो अपयशीठरला. त्यानंतर त्याने घराचे दार बंद केले आणि गॅस सिलिंडरमध्ये कात्री खुपसून स्फोट घडवला. या भीषण स्फोटामुळे धावतआलेले लोक हळहळ व्यक्त करत होते. अग्निशमन दलाने तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले आणि जखमी ओमला घाटीरुग्णालयात दाखल केले; परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जवाहरनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यातआली असून पोलिस पुढील तपास करत आहेत. ही घटना केवळ दुर्दैवी नाही, तर एक गंभीर संदेशवाहक आहे. CA सारख्या स्पर्धात्मक आणि ताणपूर्ण अभ्यासक्रमामुळे अनेकयुवक–युवती मानसिक ताणाला सामोरे जातात. ओमचा मृत्यू या ताणाच्या भयानक परिणामाचे प्रतीक आहे. ही घटना समाजालामानसिक आरोग्याविषयी जागरूक राहण्याची आणि गरजूंना मदत करण्याची व आठवण करून . पालक, शिक्षक आणि मित्रांनाविद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.

Continue Reading

कल्याणनंतर आता मालेगाव, संभाजीनगरातही मांसविक्री बंदी; स्वातंत्र्यदिनी कुलूप, सणासुदीतही व्यवसाय बंद राहणार

मुंबई: कल्याणमध्ये स्वातंत्र्यदिनी मांसविक्री बंदीच्या आदेशावरून सुरू असलेल्या वादानंतर आता मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगर शहरांतही मांसविक्री आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. हिंदू संघटनांच्या मागणीनंतर आणि विविध सणांना अनुसरून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मालेगावात तीन दिवसांसाठी बंदी मालेगाव महापालिकेने १५, २० आणि २७ ऑगस्ट या तीन दिवशी सर्व प्रकारच्या मांसविक्रीच्या दुकानांना तसेच कत्तलखान्यांना […]

Continue Reading