शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता खात्यात जमा होण्यास सज्ज, १९३२ कोटींचा निधी वितरित!

मनोरंजन

प्रतिनिधी :-मुंबई

 राज्यातील सुमारे ९४ लाख शेतकरी कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहेगेल्या काही काळापासूनप्रतीक्षेत असलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी‘ योजनेच्या सातव्या हप्त्याच्या वितरणाला अखेर राज्य सरकारने हिरवा कंदीलदाखवला आहेया हप्त्यासाठी तब्बल १९३२.७२ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी देणारा शासन निर्णय (GR) प्रसिद्धकरण्यात आला आहेज्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच २००० रुपये जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अफवांचे ढग विरळले

नमो शेतकरी योजना बंद होणार,” “पुढील हप्ता मिळण्यास खूप उशीर होणार,” अशा अनेक निराधार चर्चा आणि अफवांना गेल्याकाही दिवसांपासून पेव फुटले होतेसोशल मीडिया आणि गावच्या पारावर होणाऱ्या या चर्चांमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे आणिगोंधळाचे वातावरण निर्माण झाले होतेमात्रआशाचे कृषी विभागाने अधिकृत शासन निर्णय (GR) प्रसिद्ध करून या सर्व अफवांना सणसणीत चपराक दिली आहेसरकारच्या या निर्णयामुळ शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

काय आहे ही दुहेरी लाभाची योजना?

नमो शेतकरी महासन्मान निधी‘ ही योजना म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक प्रकारचे आर्थिक सुरक्षा कवच आहेही योजनाकेंद्र सरकारच्या लोकप्रिय ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी‘ योजनेला पूरक म्हणून काम करतेयामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनादुहेरी फायदा मिळतो पंतप्रधान किसान सन्मान निधी (केंद्र सरकार): वर्षाला ,००० रुपये (तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी ,०००रुपये).देते आणि नमो शेतकरी महासन्मान निधीच्या माध्येमातून राज्य सरकार देखील वर्षाला ,००० रुपये (तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी ,००० रुपये देते यामुळे महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना दोन्ही योजनांमधून मिळून वर्षाला एकूण १२,००० रुपयांची आर्थिक मदत मिळतेज्यामुळे त्यांनाशेतीसाठी आवश्यक असणाऱ्या खतेबियाणे आणि इतर खर्चांसाठी मोठा आधार मिळतो.

पारदर्शक प्रणाली आणि सर्वांना लाभाचे ध्येय

या निधी वितरणाची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार आहेकेंद्र सरकारच्या पीएमकिसान योजनेच्यालाभार्थ्यांच्या आकडेवारीनुसार कृषी आयुक्तालयाने निधीची मागणी केली होतीज्याला सरकारने तातडीने मंजुरी दिली.यानिर्णयाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजेशासनाने केवळ तांत्रिक बाबींवर अडकून  राहता सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवला आहेज्याशेतकऱ्यांची ‘पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम‘ (PFMS) वर नोंदणी अपूर्ण आहे किंवा ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशीजोडलेले नाहीअशा शेतकऱ्यांनाही तांत्रिक त्रुटी दूर करून या योजनेचा लाभ दिला जाणार आहेनिधी शेवटच्या आणि योग्यलाभार्थ्यांपर्यंत पोहोचावायासाठीची संपूर्ण जबाबदारी कृषी आयुक्तांवर सोपवण्यात आली आहे.

लवकरच रक्कम खात्यात जमा होईल” – कृषिमंत्री

या निर्णयावर कृषिमंत्री श्रीदत्तात्रय भरणे  यांच्याकडून शिक्कामोर्तब झाला  असुन ते माध्यमांशी बोलताना म्हणालेकी नमो शेतकरीमहासन्मान निधी‘ सातव्या हप्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आला असून, ती लवकरच सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कमजमा होईल एकंदरीतखरीप हंगामाच्या पिक काढणीच्या अत्यंत महत्त्वाच्या काळात हा निधी शेतकऱ्यांच्या हाती पडणार असल्यानेत्यांच्यासाठी हा निर्णय संजीवनी देणारा ठरला असल्याचे शेतकर्यात चर्चा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत