लोकसभेत ‘ऑनलाइन गेमिंग विधेयक’ मंजूर : मनी गेम्सवर कडक नियंत्रण, ई-स्पोर्ट्सला कायदेशीर मान्यता

राजकीय

प्रतिनिधी : नवी दिल्ली

देशात ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या प्रभावावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि जबाबदार गेमिंग वातावरणाला चालना देण्यासाठीभाजप सरकारने आणलेले ‘ऑनलाइन गेमिंग प्रमोशन अँड रेग्युलेशन बिल‘ लोकसभेत नुकतेच मंजूर झाले आहेया महत्त्वपूर्णविधेयकामुळे आता ऑनलाइन मनी गेम्सवर कठोर कायदेशीर कार्यवाही होणार असूनदुसरीकडे स्पोर्ट्स आणि सोशल गेम्सच्याविकासाला गती मिळून त्यांना अधिकृत प्रोत्साहन दिले जाणार आहे.

खेळाडूंना दिलासाप्रमोटर्सना चाप या विधेयकाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजेऑनलाइन मनी गेम्स खेळणाऱ्या सामान्य खेळाडूंनाया कायद्याअंतर्गत कोणतीही शिक्षा होणार नाहीमात्रअसे मनी गेम्स जनतेला ऑफर करणारेत्यांच्यासाठी सेवा पुरवणारेत्यांचीजाहिरात करणारे किंवा अशा खेळांना आर्थिक मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाईची या कायद्यात तरतूद करण्यात आली आहे.

तसेच यात शिक्षेची  तरतूद काय सांगते

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसारया नवीन कायद्यानुसार मनी गेम्सना प्रोत्साहन देणे किंवा ते ऑफर करणे हा गंभीर गुन्हा मानलाजाईलयासाठी  वर्षांपर्यंत कारावास आणि  कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहेतरअशा मनी गेम्सची जाहिरात करणाऱ्यांना वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा ५० लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतोमनी गेमशी संबंधित आर्थिक व्यवहारात सहभागी असलेल्यांवरही वर्षांपर्यंत कारावास आणि  कोटी रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाईलविशेष म्हणजेजर एखाद्याने हा गुन्हा पुन्हा केलातरशिक्षेची व्याप्ती वाढून  ते  वर्षांपर्यंत कारावास आणि  कोटी रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतोहे सर्व गुन्हे दखलपात्रआणि अजामीनपात्र स्वरूपाचे असतील

तपास यंत्रणांना  या विधेयकामुळे  मनी गेमिंगशी संबंधित प्रकरणांमध्ये मोठे अधिकार प्राप्त झाले आहेतसंशयास्पद आर्थिकव्यवहार तपासणेडिजिटल तसेच इतर मालमत्ता जप्त करणे आणि काही विशिष्ट प्रकरणांमध्ये वॉरंटशिवाय छापे टाकणे  अटककरणे यासाठीही तपास अधिकाऱ्यांना अधिकृत करण्याचे अधिकार केंद्र सरकारकडे असतीलयामुळे मनी गेमिंगच्या जाळ्याचा छडालावणे अधिक सोपे होईलअसे बोलले जात आहे.

त्याच बरोबर आता ईस्पोर्ट्स आणि सोशल गेम्सना चालना एकीकडे मनी गेम्सवर प्रतिबंध आणला जात असतानाचकेंद्र सरकारनेस्पोर्ट्स आणि ऑनलाइन सोशल गेम्सच्या भविष्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले आहेआतापर्यंत कायदेशीर मान्यतानसलेल्या स्पोर्ट्सला युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून एक विशेष कायदेशीर चौकट तयार करून दिली जाईलतसेचभविष्यात ऑनलाइन सोशल गेम्सनाही सरकारकडून प्रोत्साहन मिळेलअसे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहेयामुळे खेळाडूआणि उद्योजकांना एक सुरक्षित आणि कायदेशीर व्यासपीठ उपलब्ध होईल. असे सरकारचे मत आहे

सरकारचे स्पष्टीकरणसामाजिक समस्यांवर नियंत्रण या विधेयकामागची भूमिका स्पष्ट करताना सरकारने म्हटले आहे कीऑनलाइन मनी गेम्समुळे समाजात अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेतयात आर्थिक फसवणूकमोठ्या प्रमाणावर वाढली असल्याने खेळाडूंचे व्यसनकुटुंबांमध्ये कलह आणि काही प्रकरणांमध्ये आत्महत्येसारख्या दुर्दैवी घटनांचा देखील समावेशआहे.त्यामुळे नागरिकांचे हित जोपासण्यासाठी कठोर पावले उचलणे अनिवार्य होते

 असे सरकारने नमूद आहे. या  विधेयकामुळे ऑनलाइन गेमिंग क्षेत्राला एक नवी दिशा मिळेल आणि ते अधिक जबाबदार  सुरक्षितबनेलअशी अपेक्षा  सरकार कडून व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत