धाराशिव-कळंबमध्ये शिवसेनेची नवीन फळी; उप-तालुकाप्रमुख आणि विभागप्रमुखांची नियुक्ती

राजकीय

धाराशिव: शिवसेनेने धाराशिव आणि कळंब तालुक्यात आपल्या संघटनेला बळकट करण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. दिलीप सावंत यांची धाराशिव उप-तालुकाप्रमुखपदी, तर भगवान ओझाळ यांची कळंब उप-तालुकाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच विविध विभागांमध्येही नवीन प्रमुख पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या हस्ते या नियुक्त्या करण्यात आल्या. या नवीन नियुक्त्यांमुळे कळंबमधील शिवसेनेच्या संघटनात्मक कार्याला नवी दिशा मिळेल आणि आगामी काळात पक्षाच्या कामात वाढ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

नवीन विभागप्रमुख आणि त्यांचे कार्यक्षेत्र:

  • संजय बाबा बारकुळ: येरमाळा विभागप्रमुख
  • रामकिसन वाघमारे: मोहा विभागप्रमुख
  • बालाजी कवडे: ईंटकुर विभागप्रमुख
  • समाधान फेरे: पळसप विभागप्रमुख
  • अविनाश गोफणे: आंबेजवळगा विभागप्रमुख
  • रामचंद्र कदम: उपळा विभागप्रमुख

या नियुक्ती समारंभास पक्षाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये महिला आघाडी जिल्हाप्रमुख भारतीताई गायखवाड, कल्पनाताई माळी, कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अरुण भाऊ डोलारे, कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग अंकुश, शहरप्रमुख आकाश कोकाटे, युवासेना तालुकाप्रमुख ईश्वर शिंदे, उपतालुकाप्रमुख काका वाकुरे, उपतालुकाप्रमुख धनाजी साळुंके, उपतालुकाप्रमुख सुमित गायखवाड, उपतालुकाप्रमुख रमेश्वर मगर, भीम अण्णा जाधव, प्रवीण पवार, नवनाथ सूर्यवंशी, प्रशांत कोळी आणि अन्य शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या वाढीसाठी आणि जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध राहण्याचे आश्वासन दिले. त्यांना पुढील वाटचालीस उपस्थित सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. या नियुक्त्यांमुळे स्थानिक पातळीवर शिवसेनेची पकड आणखी मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत