रक्षाबंधन स्पेशल कॅशबॅक योजना? माहितीसाठी वाचा ही खरी बातमी!

क्राइम

रक्षाबंधनच्या आनंदात सोशल मीडियावर आणि मेसेजिंग अॅप्सवर एक असा मेसेज जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात सांगितले जाते की सरकारकडून प्रत्येक बहिणीसाठी रक्षाबंधनाच्या दिवशी २ हजार रुपयांची कॅशबॅक योजना सुरू केली आहे. या मेसेजसोबत काही लिंकही दिल्या आहेत, ज्यावर क्लिक केल्यावर पैसे मिळतील असा दावा केला जातो.

राखी फोटो

पण यामागील सत्य काही वेगळं आहे. “रक्षाबंधन कॅशबॅक योजना” या नावाने फिरणाऱ्या मेसेजचा आणि लिंकचा कोणताही अधिकृत आधार नाही. केंद्र सरकार किंवा कोणत्याही राज्य सरकारने अशी कोणतीही योजना जाहीर केलेली नाही.

या व्हायरल मेसेजमागे मोठा धोका दडलेला आहे. लिंकवर क्लिक केल्यावर तुमची वैयक्तिक माहिती, बँक डिटेल्स, आधार नंबर, फोन नंबर यांसारखी महत्त्वाची माहिती विचारली जाऊ शकते. या माहितीचा गैरवापर करून तुमची ओळख किंवा पैसे चोरीला जाऊ शकतात. काही वेळा या लिंकवर क्लिक करताच तुमच्या मोबाईलमध्ये व्हायरस किंवा मालवेअर सॉफ्टवेअर इन्स्टॉल होऊ शकते. शिवाय, अनेक लोकांनी सांगितले आहे की, अशा लिंकवर क्लिक केल्यानंतर कॅशबॅक किंवा पैसे कधीच मिळाले नाहीत.

लिंकच्या माध्यमातून फसवणूक करण्याचा डाव असल्यामुळे कोणत्याही अनोळखी किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका. फसवणूक झाल्यास लगेच १९३० या सायबर क्राईम हेल्पलाइन नंबरवर कॉल करा किंवा Cybercrime.gov.in पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदवा.

सरकारकडूनही याबाबत स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. पीआयबी (प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो) आणि इतर सरकारी माध्यमांनी अशा फसवणुकीपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन केले आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी अशा फसवणुकीविरोधात कठोर कारवाई करणार असल्याचेही सांगितले आहे. त्यामुळे कोणतीही योजना किंवा कॅशबॅक मिळवायची असेल तर फक्त अधिकृत वेबसाइट्स किंवा विश्वसनीय माध्यमांतूनच माहिती घेणे आवश्यक आहे.

आमच्या पडताळणीत देखील अशी कोणतीही रक्षाबंधन कॅशबॅक योजना केंद्र किंवा राज्य सरकारकडून अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अशा फेक मेसेजेसवर विश्वास ठेवू नका आणि आपल्या महत्त्वाच्या माहितीची सुरक्षा करा, असे सरकारकडून आव्हान करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत