कोल्हापूरच्या माधुरी हत्तीच्या आरोग्यासाठी PETA इंडियाचा आक्षेप; वनतारा ट्रस्टकडील प्रगत पशुवैद्यकीय सुविधांची गरज

मनोरंजन

कोल्हापूर येथील माधुरी हत्तीच्या आरोग्याच्या संदर्भात PETA इंडियाने महत्त्वाचा आक्षेप नोंदवला आहे. माधुरीला मुक्तपणे फिरण्यासाठी, वेदना कमी करण्यासाठी आणि तिच्या आजारपणांवर उपचार करण्यासाठी प्रगत दर्जाच्या पशुवैद्यकीय सुविधा अत्यंत आवश्यक असल्याचा PETA चा दावा आहे. महाराष्ट्रात सध्या अशी सेवा देणारी वनतारा राधे कृष्ण मंदिर एलिफंट वेल्फेअर ट्रस्ट ही एकमेव संस्था असल्याचा त्यांनी विशेष उल्लेख केला आहे.

PETA इंडियाने म्हटले आहे की, मानवांसारखेच हत्तींनाही वेदनाशामक उपचार, आरामदायक वातावरण आणि इतर हत्तीसोबत सामाजिक सहवासाची गरज असते. माधुरीला ग्रेड-४ संधिवात असून तिच्या वेदना आणि मानसिक त्रासावर उपचार करणे अत्यंत गरजेचे आहे. ती गेल्या ३३ वर्षांपासून एकट्या आणि कडक काँक्रीटवर राहते, ज्यामुळे तिच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाशी PETA सहमत असून, न्यायालयाने माधुरीला मुक्त आणि शांततामय जीवन देण्याचा निर्णय घेतला आहे. PETA ने म्हटले आहे की, जर महाराष्ट्रात वनतारा प्रमाणे उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध झाल्या तर ते माधुरीला तिथे स्थानांतरित करण्यात विरोध करणार नाहीत.

तिच्या भयानक वेदनांमुळे माधुरी कधी कधी आक्रमक वर्तन देखील दाखवते. त्यामुळे तिला साखळी मुक्त ठेवणे, पशुवैद्यकीय उपचार करणे आणि इतर हत्तीसोबत संवाद साधण्याची व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक आहे.

PETA इंडियाने वनतारा ट्रस्टची प्रशंसा करत म्हटले आहे की ही संस्था माधुरीला आवश्यक सर्व सुविधा पुरवते आणि तिला हत्तींच्या कळपात एकत्र राहण्याची संधी देते, जी तिच्या मानसिक आणि शारीरिक पुनर्वसनासाठी महत्त्वाची आहे, असे पेटा इंडियाच्या अधिकृत निवेदनात स्पष्ट केले गेले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत