बेंबळीच्या कुलस्वामिनी शुगर्समध्ये गळीत हंगामाचा शुभारंभ; दीड लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

उद्योग

प्रतिनिधी | धाराशिव

तालुक्यातील बेंबळी येथील कुलस्वामिनी नॅचरल शुगर्स कारखान्याचा २०२५-२६ गळीत हंगामाचा शुभारंभ आज पार पडला. बेंबळी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणेश पाटील यांच्या हस्ते मिल रोलर पूजन करण्यात आले.

कार्यक्रमात कारखान्याचे संस्थापक व माजी नगराध्यक्ष मधुकररावजी तावडे यांनी सांगितले की, यंदाच्या हंगामात दीड लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ऊसतोडणी व वाहतूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून, कारखाना ऑक्टोबर महिन्यात सुरू करण्याचा निर्धार आहे.

कारखान्याची यंत्रसामग्री दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण झाली असून, सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन तावडे यांनी केले. या कार्यक्रमास चेअरमन आकाश मधुकरराव तावडे, जनरल मॅनेजर शरद गुंड, बिट अंमलदार सुनील कोळेकर, रमेश कदम, पोलिस कर्मचारी बोंदर, खलील शेख, चिफ केमिस्ट माने, मुख्य शेतकी अधिकारी तवले, राजाभाऊ गुंड, ऊस पुरवठा अधिकारी सचिन मुंडे तसेच सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत